...म्हणून बायकोला हवा घटस्फोट!
Jan 1, 2014, 02.21PM IST
मटा ऑनलाइन वृत्त । दुबई
दुबईतल्या एका नवविवाहित तरुणाला टेबलावर बसून नीट जेवता येत नसल्यानं त्याचं वैवाहिक जीवन धोक्यात आलं आहे, यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु, हे १०० टक्के खरं आहे. जेवणाचे 'मॅनर्स' नसल्यानं या तरुणाच्या पत्नीनं त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे.
एखादं लग्न कुठल्या कारणावरून तुटेल, हे हल्ली सांगता येत नाही. सगळ्याच तरुणींना आपला नवरा मिस्टर परफेक्शनिस्ट हवा असतो आणि सगळ्या तरुणांना आपली बायको सर्वगुणसंपन्न हवी असते. त्यामुळे लग्नानंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही त्यांच्यात खटके उडू लागतात आणि मग अगदी लगीनगाठ तुटेपर्यंत हे वाद ताणले जातात. असंच काहीसं दुबईतल्या एका जोडप्याच्या बाबतीत झालंय.
कुवेतमधील एका तरुणीनं दुबईमधील तरुणाशी लग्न झालं. त्यांच्या लग्नाला आठवडा होतो, तोच आपल्या पतीला टेबल मॅनर्स नसल्यानं तरुणीची चीडचीड होऊ लागली. हा संताप इतका विकोपाला गेला की, जेवणाची शिस्त नसलेल्या पुरुषासोबत आपण अख्खं आयुष्य काढू शकत नाही, असं या नव्या नवरीनं ठरवून टाकलं आणि नव-याकडे थेट घटस्फोट मागितला.
हा प्रकार आपल्याला चमत्कारिक वाटत असला, तरी कुवेतमध्ये यापेक्षाही भारी चमत्कार घडलेत. अनेक चित्रविचित्र कारणांवरून तिथे याआधीही घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आलेत. आपला पती टुथपेस्ट ट्युब मध्येच दाबून पेस्ट काढतो, या क्षुल्लक कारणावरून एका पत्नीनं घटस्फोट मागितल्याचा विचित्र प्रकार तिथे घडला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यामुळे आता दुबईतल्या पती-पत्नीचा वाद किती ताणला जातो, की त्यावर काही तोडगा निघतो, हे पाहावं लागेल.

No comments:
Post a Comment
Please let us know your comments!